हिवरखेडे मका प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई
- मंत्री छगन भुजबळ
मुंबई, दि. २४: चांदवड तालुक्यातील हिवरखेडे खरेदी केंद्रावर परतालुक्यातील मका अनधिकृतपणे विक्री होत असल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.
या संदर्भात सदस्य राहुल आहेर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
त्यावर उत्तर देताना मंत्री भुजबळ म्हणाले की, केंद्र शासनाकडून सुरुवातीला ६ लाख ६० हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर राज्याच्या मागणीनुसार आणखी ५ लाख क्विंटलची परवानगी मिळून एकूण उद्दिष्ट ११ लाख ६० हजार क्विंटल झाले आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे ७ लाख ५० हजार क्विंटल मका खरेदी पूर्ण झाली असून सुमारे ११५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment