Tuesday, 17 March 2026

ड्रग्सविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार

 ड्रग्सविरोधात झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार;

सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही जप्त करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.१७: नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात ड्रग्स तस्करांविरोधात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन अमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मोतीबाग येथील ड्रग्स तस्करांच्या घरांवर छापे टाकून गांजा व अग्निशस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत विकास ठाकरेविक्रम पाचपुते आणि डॉ. नितीन राऊत यांनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीसंबंधित प्रकरणात सामाजिक गुन्हेगारी नियंत्रण कायदा१९९९ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असूनपुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi