Saturday, 28 March 2026

एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची · पल्स परिषदेत सहभागी तज्ज्ञांचे मत

 एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची

·       पल्स परिषदेत सहभागी  तज्ज्ञांचे मत

            मुंबई: प्रतिबंधात्मक आरोग्यसेवापारंपरिक वैद्यक आणि आधुनिक उपचारपद्धती यांचा समन्वय साधण्याची आवश्यकता असून एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची असल्याचे  मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी अधोरेखित केले.

बीकेसी जिओ कनव्हेंशन सेंटर येथे आयोजित  पल्स परिषदेत स्ट्रेन्यनिंग प्रिव्हेंटिव अँड ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टिमट्रांझिशनिंग फ्रॉम कल्चर ॲसेट टू इंटीग्रेटेड मेडिसिन सिस्टिम या विषयावरील  चर्चासत्रात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकात्मिक आरोग्य व्यवस्थेची आवश्यकता यावर मत मांडले.

या चर्चासत्रातून भारतातील पारंपरिक वैद्यक ही केवळ सांस्कृतिक ठेवा नसून ती आधुनिक आरोग्य व्यवस्थेचा प्रभावी भाग ठरू शकतेअसा निष्कर्ष समोर आला. मात्रत्यासाठी वैज्ञानिक आधारप्रभावी धोरणे आणि सर्व पद्धतींमधील समन्वय अनिवार्य असल्याचे स्पष्ट झाले. प्रतिबंधात्मक व पारंपरिक वैद्यक प्रणाली बळकटीकरणावर भर देण्याच्या आवश्यकतेवर ही यावेळी चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi