सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध योजना सुरू केल्याचे सांगितले.
राज्य सरकारने स्वयंपूर्ण विकासासाठी विविध सवलती व धोरणात्मक निर्णय घेतले असून, सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. मुंबई बँकेने गिरणी व माथाडी कामगारांसाठी कर्जसुविधा, महिलांसाठी झिरो बॅलन्स खाते उघडण्याची मोहीम आणि व्याजमुक्त कर्ज योजना राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. सहकार भवन उभारणीमुळे आधुनिक सुविधा, कार्यशाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहकारी चळवळीला नवी दिशा मिळेल, असे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सहकार चळवळ परंपरेतून उभी राहिली असून, भविष्यातही महिलांना व तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.
No comments:
Post a Comment