Saturday, 7 March 2026

देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा · देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के

  

राज्याच्या  अर्थव्यवस्थेत  ७.९ टक्के  वाढ अपेक्षित राज्याचे दरडोई उत्पन्न ३.४७ लाखांवर

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26’ सादर

 ·       देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा

·       देशातील थेट परकीय गुंतवणुकीत ३१ टक्के वाट्यासह राज्य अग्रस्थानी

·       स्टार्टअप्सच्या संख्येतही राज्याचा देशात सर्वाधिक १७ टक्के हिस्सा

          नवीकरणीय ऊर्जेची क्षमता वाढत असून राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर

·       ६३.८५ लाख सूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांची नोंदणी

                        त्यातून २.५२ कोटींहून अधिक रोजगार निर्माण

मुंबईदि. ५ : राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षात ती ७.९ टक्क्यांनी वाढेलअसा अंदाज महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कृषीउद्योग आणि सेवा क्षेत्रातील संतुलित वाढपायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेसाठी केलेल्या सुधारणा यामुळे राज्याची आर्थिक स्पर्धात्मकता अधिक बळकट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

       महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२५-२६ अहवाल विधानसभेत वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी तर विधानपरिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सादर केला.  

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi