Thursday, 19 March 2026

हिंजवडी आयटी पार्क फसवणूक प्रकरणात दोषींवर कारवाई

 हिंजवडी आयटी पार्क फसवणूक प्रकरणात दोषींवर कारवाई

- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

मुंबई,दि.१८: पुणे येथील  हिंजवडी आयटी पार्कमध्ये एक हजार फ्रेशर्स पदवी धारकांना  नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या प्रकरणात कामगार विभागाने तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित प्रकरण पोलिसांकडे वर्ग केले असून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी  विधानसभेत दिली.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये १,००० फ्रेशर्स पदवीधारकांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याने पैसे परत मिळविण्यासाठी विशेष तपास पथकाची मागणी करण्यात आली आहे. तसेच आयटी क्षेत्रातील जबरदस्तीचे राजीनामेकामावरून कमी करणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट नियम व आयटी कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याची लक्षवेधी सदस्य शंकर जगताप यांनी मांडली


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi