Tuesday, 17 March 2026

उमरखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी राज्य शासन सकारात्मक

 उमरखेड मतदारसंघातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी राज्य शासन सकारात्मक

- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले

 

मुंबईदि.१७ :  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत राज्य शासन सकारात्मक आहे भविष्यातील वाहतुकीचा विचार करून नवीन कामे येथे कशी करता येतील असे उत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिले.

आमदार किसन वानखेडे यांनी मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आणि रुंदीकरणाच्या निकडीबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी विभागाची भूमिका स्पष्ट केली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi