मुंबईत स्वतंत्र नाट्यगृह व चित्रपटगृह उभारणार
- सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार
मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य
कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी ९० लाखाचा निधी वाटप
मुंबई, दि.२४ : मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य या योजनेंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी चित्रपटगृहांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे. तसेच मुंबईत एकत्रित सुविधांसह स्वतंत्र नाट्यगृह व चित्रपटगृह उभारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment