Tuesday, 17 March 2026

हिंगणा एमआयडीसीचा प्रश्न संचालक मंडळासमोर मांडून निर्णय घेण्यात येणार

 हिंगणा एमआयडीसीचा प्रश्न संचालक मंडळासमोर मांडून निर्णय घेण्यात येणार

- राज्यमंत्री इंद्रनील नाईक

 

मुंबईदि.१७ : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करण्याबाबत राज्य शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका  बजावली आहे.  हा विषय एमआयडीसीच्या संचालक मंडळासमोर मांडून निर्णय घेणार असल्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत सांगितले.

आमदार समीर मेघे यांनी एमआयडीसी क्षेत्रातील तीन गावांमधील १९८० पूर्वीच्या अतिक्रमित जागेचा आणि तिथे राहणाऱ्या नागरिकांना निवासी पट्ट्यांचे वाटप करणे या अनुषंगाने लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi