Sunday, 29 March 2026

ई-गव्हर्नन्स अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने नाविन्यपूर्ण व प्रभावी उपक्रम राबवून

 ई-गव्हर्नन्स अंतर्गत पाणी पुरवठा    स्वच्छता विभागाने नाविन्यपूर्ण व प्रभावी उपक्रम राबवून कार्यक्षमपारदर्शक आणि नागरिकाभिमुख सेवा प्रणाली विकसित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), IoT, GIS आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करून पाणीपुरवठा व्यवस्थापनतक्रार निवारण आणि सेवा वितरण अधिक सक्षम करण्यात आले आहे.

 

AI आधारित प्रणालीद्वारे पाणीपुरवठागुणवत्तादाब आणि वापर यांचे रिअल-टाईम विश्लेषण केले जात असून नागरिकांच्या अभिप्रायाचे स्वयंचलित विश्लेषण करून सेवेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहे. तसेच GIS व रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जिओटॅगिंगनकाशे व निर्णय सहाय्य प्रणाली (Decision Support System) विकसित करून नियोजन आणि निर्णयप्रक्रिया अधिक अचूक करण्यात आली आहे.

 

तक्रार निवारण प्रणाली सुदृढ करून वेळेत तक्रारींचे निराकरणडेटा विश्लेषण आणि एस्कलेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-ऑफिस व डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रक्रिया सुलभीकरणडेटा अद्ययावतीकरण आणि कामकाजाचे प्रभावी निरीक्षण केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi