हॉलिस्टिक वेलनेसचे अध्यक्ष, संस्थापक व कोच डॉ. मिकी मेहता यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान, योग, ध्यान आणि पारंपरिक ज्ञान यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे. मानवी अंतर्ज्ञान आणि जैविक प्रणालींचे महत्त्व कायम राहणार असून AI ही फक्त सहाय्यक साधन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेल्थ इनोव्हेशन एक्स्चेंज चे सह-संस्थापक प्रदीप कक्कतील यांनी आरोग्य क्षेत्रातील वाढत्या बाजारपेठेचा आणि AI, वेअरेबल्स व डेटा-आधारित उपाययोजनांचा वेगाने होत असलेला विकास अधोरेखित केला. शासन खाजगी क्षेत्र, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांनी एकत्र येऊन दीर्घकालीन भांडवल व शाश्वत मॉडेल तयार करणे गरजेचे आहे. केवळ नफा किंवा ‘युनिकॉर्न’ होण्यावर लक्ष केंद्रित न करता सर्वसामान्यांसाठी उपयुक्त उपाय विकसित करणे महत्त्वाचे आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूल च्या शस्त्रक्रिया विषयातील व्याख्याता, कॅनोमिक्स इंक च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व सह-संस्थापक डॉ लीना प्रधान यांनी आयुर्वेदिक वनस्पती आणि घटकांच्या वैज्ञानिक पडताळणीवर भर दिला. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वनस्पतींचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जनुकीय (gene level) पातळीवर समजून घेणे आणि ग्राहकांना वैज्ञानिक माहिती देणे अत्यंत आवश्यक असे त्या म्हणाल्या.
No comments:
Post a Comment