Tuesday, 17 March 2026

मुंबई उपनगरच्या आर मध्य आणि एच पश्चिम वार्डातील सर्व वृक्षांची आरोग्यविषयक सखोल तपासणी

 मुंबई उपनगरच्या आर मध्य आणि एच पश्चिम वार्डातील

सर्व वृक्षांची आरोग्यविषयक सखोल तपासणी

                                        - मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲडआशिष शेलार

 

मुंबईदि.16 : मुंबईतील पर्यावरण संवर्धन आणि वृक्षसंवर्धन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व झाडांची सखोल तपासणी करण्याचा पायलट प्रकल्प मुंबईतील आर मध्य आणि एच पश्चिम या भागात राबविण्यात येणार आहेअशी माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲडआशिष शेलार यांनी दिली.

मंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात वृक्षसंवर्धनासंदर्भात बैठक झालीया बैठकीस आमदार संजय उपाध्यायमुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुंबई उपनगरांतील प्रत्येक झाडाचे डिजिटल मॅपिंगआरोग्य तपासणी आणि व्यवस्थापन करण्याची संपूर्ण प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीयामुळे मुंबई उपनगरातील सर्व झाडांचे वयप्रजातीआरोग्यस्थितीफांद्यांची वाढछाटणीची आवश्यकतातसेच झाडांमुळे होणारे पर्यावरणीय फायदे याची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi