Monday, 16 March 2026

पुण्यात मेट्रोचे 200 किमीचे जाळे उभारणार

 पुण्यात मेट्रोचे 200 किमीचे जाळे उभारणार

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
----
पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन


पुणेदि. 15 (जिमाका वृत्तसेवा) – पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिकापिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास 200 किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन 
 असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील श्री.फडणवीस यांनी दिली.

   
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मेट्रो भवनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.


या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवारउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळपुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेखासदार मेधा कुलकर्णीआमदार योगेश टिळेकरभीमराव तापकीरसुनील कांबळेहेमंत रासनेबापू पठारेनगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्तापुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi