Thursday, 19 March 2026

कलम 155 च्या गैरवापर प्रकरणी चौकशीचे आदेश दोषींवर कडक कारवाई होणार

 कलम 155 च्या गैरवापर प्रकरणी चौकशीचे आदेश

दोषींवर कडक कारवाई होणार

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. १८ : महसूल विभागात कलम १५५ च्या गैरवापरामुळे जमीन नोंदींमध्ये झालेल्या गंभीर अनियमिततेची शासनाने दखल घेतली असून या संदर्भात राज्यात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य ॲड. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री बावनकुळे बोलत होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले कीपुणे जिल्ह्यात 38,047 प्रकरणे आढळून आली असून त्यापैकी 2,388 प्रकरणांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत नावांमध्ये बदलजमिनीचे क्षेत्रफळ कमी-जास्त करणे तसेच सातबारा उताऱ्यात फेरफार केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

या प्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू असून राज्यातील सर्व विभागांना अशी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नोंदींचे पुनरावलोकन करून आवश्यक दुरुस्त्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील नागरिकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी शासन कटिबद्ध असून अधिवेशन संपेपर्यंत या प्रकरणाचा सविस्तर अॅक्शन टेकन रिपोर्ट’ सभागृहात सादर करण्यात येईलअसेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

या चर्चेत सदस्य सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi