Wednesday, 4 February 2026

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पुर्ण करण्याकडे भर.!

 केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान;

अजितदादांचे स्वप्न पुर्ण करण्याकडे भर.!

-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदीशेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना

 

मुंबईदि.१केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी हे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारतर्फे मांडण्यात आलेला हा अर्थसंकल्प शेती व शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारा ठरेलअसा विश्वास वाटतो. कृषी बजेट वाढवून सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत देण्यात आले असून ही बाब महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच आनंदाची आहे. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करताना देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे यावर विशेष भर देण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi