परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती
§ राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ
नवी दिल्ली, दि. ६ : भारतातील पर्यटन क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरत असून, गेल्या तीन वर्षांत राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सन २०२२ मध्ये महाराष्ट्रात १.५१२ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी भेट दिली होती, हा आकडा २०२४ मध्ये वाढून ३.७०५ दशलक्षवर पोहोचला असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.
No comments:
Post a Comment