Friday, 13 February 2026

नाशिक, पुणे, नागपूर येथे ‘इन्क्युबेशन पार्क’ व ‘फार्मा पार्क’ उभारणार

 नाशिकपुणेनागपूर येथे इन्क्युबेशन पार्क’ व फार्मा पार्क’ उभारणार

- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

 

नवी दिल्लीदि. १२ : राज्यातील औषध संशोधनउत्पादन व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नाशिकपुणे आणि नागपूर येथे इन्क्युबेशन पार्क’ व फार्मा पार्क’ उभारण्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री नड्डा यांनी प्राथमिक स्तरावर मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली.

 

अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असूनत्यांनी विविध केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन राज्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत पाठपुरावा केला. केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्यासोबत राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सक्षमीकरणाबाबतही चर्चा झाली. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक निधीत वाढ करण्यास केंद्रीय मंत्री नड्डा यांनी मान्यता दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi