याचबरोबर राज्यातील वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम’ (व्हीएएमएस) हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे पदनिहाय माहिती, तज्ज्ञ व विशेषज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, संस्थात्मक माहिती, सेवा तपशील तसेच अनुपस्थिती नियंत्रण यांची अचूक नोंद ठेवता येणार आहे. अधिक माहितीसाठी www.vams.org.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.
या प्रणालीमुळे जिल्हानिहाय तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता तात्काळ ओळखणे शक्य होणार असून ग्रामीण व दुर्गम भागात वैद्यकीय सेवांचे प्रभावी नियोजन करता येणार आहे. बदली, पदोन्नती व नवीन नियुक्त्यांची शास्त्रोक्त प्रक्रिया राबविता येणार असून डेटा-आधारित मनुष्यबळ व्यवस्थापनामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावणार आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी या पोर्टलमध्ये विविध प्रकारचे 'रिअल-टाइम' अहवाल तयार करण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे :
• पदनिहाय माहिती: जिल्हा निहाय रिक्त व भरलेली पदे, गट 'अ' आणि 'ब' पदे, तसेच प्रवर्गानुसार पदांचा तपशील.
• तज्ज्ञ आणि विशेषज्ञ उपलब्धता: विशेषज्ञ निहाय रिक्त व भरलेल्या पदांची माहिती आणि डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता.
• संस्थात्मक माहिती: जिल्हा निहाय आरोग्य संस्थांचे विभाग आणि संस्था प्रकारानुसार (पीएचसी, आएच, डीएच) वर्गीकरण.
• सेवा तपशील: नियुक्ती प्रकारानुसार वैद्यकीय अधिकारी, सेवाकाल निहाय माहिती आणि आगामी काळात निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी.
• अनुपस्थिती नियंत्रण: जिल्हा निहाय सध्या कार्यरत नसलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अचूक डेटाबेस
No comments:
Post a Comment