Wednesday, 11 February 2026

रत्नपुरी मळ्यातील हजार एकर जमीन औद्योगिकरणासाठी एमआयडीसीला

 रत्नपुरी मळ्यातील हजार एकर जमीन औद्योगिकरणासाठी एमआयडीसीला

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) हस्तांतरित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे यापरिसरातील उद्योजकांना सुविधा तसेच  गुंतवणूक व रोजगार संधी निर्माण होणार

पुणे जिल्हा आणि परिसरातील वाढत्या औद्योगिकरणास पुरेशी जमीन उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य़ औद्योगिक विकास महामंडळाने राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील एक हजार एकर जमीन मिळण्याबाबत मागणी केली होती. त्या मागणीस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली.

या जमिनीमुळे पुण्यातील वाढत्या औद्योगिकरणाला जमीन उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी शेती महामंडळाकडील जमीन एमआयडीसीला उपलब्ध करुन देण्याबाबत योग्य  ती कार्यवाही करावीअसाही निर्णय घेण्यात आला.

--00--

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi