राज्य शेती महामंडळाने उपलब्ध जागेची उपयोगिता
निश्चित करुन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे सुमारे 38 हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जमिनीची उपयोगिता, भविष्यातील नियोजन याबाबत तज्ज्ञ सल्लागारामार्फत सर्वेक्षण करुन जागेचा योग्य उपयोग तसेच महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाची 330 वी बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रंजन महिवाल, वित्त विभागाचे सहसचिव विवेक दहिफळे, महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांच्यासह महामंडळाचे संचालक यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment