विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर म्हणाले, भारताने जगाला अनेक तत्वे दिली आहेत. त्यापैकी जग हे एक कुटुंब असल्याचे ' वसुधैव कुटुंबकम तत्व आहे. विकसित भारतासाठी सुरक्षा दलांचे मोठे सहकार्य राहणार आहे. भारत हा जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहोत. आज आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत. सीआयएसएफ ने देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेत सीआयएसएफचे कार्य उल्लेखनीय आहे. सायक्लोथॉन हा उपक्रम लोकपयोगी आहे.
महासंचालक प्रवीण रंजन म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणे हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. या संकल्पपूर्तीसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशाच्या एकात्मकतेसाठी सागरी किनारी भागात हा उपक्रम राबवित आहे. सीआयएसएफची ४७ युनिट सागरी किनारी भागात आहे. किनारी गावांमध्ये सागरी सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. ग्रामस्थांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना सागरी सुरक्षेविषयी जागरूक करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment