सहकार मंत्री पाटील म्हणाले, आनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. नागपूर (अवसायनात) या पतसंस्थेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी विनासायास परत मिळाव्यात. यासाठी ज्यांनी हा आर्थिक गैरव्यवहार केला आहे त्यांच्या मालमत्ता जप्त करून नियमानुसार त्यावर कार्यवाही करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्यात याव्यात. या संदर्भात होत असलेल्या कार्यवाहीचा दर महिना आढावा घ्यावा, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.
या पतसंस्थेच्या २५ अपचारी संचालक यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सहा मालमत्ता जप्त करण्यात आल्या असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. उर्वरित मालमत्ता जप्ती प्रकरणी तातडीने कार्यवाही करून ठेवीदारांना दिलासा द्यावा असे, स्पष्ट निर्देश सहकार मंत्री पाटील यांनी दिले.
No comments:
Post a Comment