३५० वर्षांपूर्वीचा बंजारा समाजाचे व्यापारी महत्त्व
मुघल काळात बंजारा समाज हा उपखंडातील सर्वात मोठा स्थलांतरित व्यापारी वर्ग मानला जात असे. धान्य, मीठ, कापड, कच्चा माल आणि लष्करी पुरवठा हे मुख्य व्यवसाय. त्या काळातील असुरक्षितता आणि लुटालुट लक्षात घेऊन या समाजाने समुदायातून व्यापार केला.स्वसंरक्षण आणि त्यासाठी आवश्यक शस्त्रकला यामध्ये हा समाज पारंगत होता.भटकंती संदर्भातील रस्ते, जोखीम आणि प्रसंगी लढण्याचे कसब त्यांना अवगत होते. देशाटन करण्याची कला या समुदायाने विकसित केली होती.मोठ्या बैलगाड्यांच्या तांड्यांद्वारे (कारवाँ) हजारो किलोमीटरचा प्रवास केला जात असे.
मुघल लष्कराचा अन्नपुरवठा प्रामुख्याने बंजाऱ्यांकडून होत असल्याची नोंद तत्कालीन प्रशासनिक कागदपत्रांत आढळते. दुष्काळी परिस्थितीतही अन्नधान्याची वाहतूक करून त्यांनी राजकारभार स्थिर ठेवला.
No comments:
Post a Comment