मंत्री दादाजी भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना व पालकांना नसते. या योजनांपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रयत्न केले जावे. प्रमुख योजनांची माहिती ठळक स्वरूपात तीन बाय चार आकाराच्या फलकाद्वारे प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी जागी लावली जावी.
मंत्री दादाजी भुसे म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून अनाथ विद्यार्थ्यांसह, तसेच ज्याचे दोन्ही पालक अपंग आहेत असे विद्यार्थी, पॉक्सो कायदा अंतर्गत नुसार पिडित विद्यार्थी आदींना शिक्षणासाठी दरमहा 2,250 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने यासाठी नियुक्त संस्थांनी अशा बालकांचा शोध घेऊन त्यांची परिपूर्ण माहिती द्यावी. जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती कडून यासाठी कार्यवाही केली जाते. एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना कालावधी सुरू केलेली योजना आता नियमित स्वरूपात सुरू आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सर्व अनुदान व विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी आणि प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. एकूण 21534199 विद्यार्थ्यांपैकी 1045125 विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी असून त्या साठी कार्यवाही केली जावी अशा सूचना मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित विविध बाबींची माहितीच सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
No comments:
Post a Comment