Friday, 6 February 2026

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

 हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

-कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

 

मुंबईदि. ४: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना योजना विभागाने प्रभावीपणे राबवण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावीअसे निर्देश कृषीवित्त व नियोजनमदत व पुनर्वसनकामगार आणि विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी कार्यालयाच्या सभागृहात कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० चा आढावा  घेतला. यावेळी प्रकल्प संचालक परिमल सिंहकृषी विभागाचे उप सचिव श्री. चंदनशिवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi