राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• प्रशासकीय सुधारणांचा ‘जीपीआर 2.0’ उपक्रम
• प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले महाराष्ट्राचे कौतुक
मुंबई, दि. 9 :- राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने ‘जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘जीपीआर 2.0’ उपक्रमाच्या टप्पा एक व टप्पा दोनबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment