Saturday, 14 February 2026

थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक

 थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी

शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक


            -अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

· ‘थेट विक्री क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसर; मुंबईत 'महाविकास २०२६' परिषद

मुंबई,, दि १४ : सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण करण्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव असणे आणि कंपन्यानी त्यादृष्टीने योग्य सेवा देण्यासाठी बांधील असणे गरजेचे आहे. यासाठी थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.


मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे 'महाविकास-२०२६' या विशेष संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील ग्राहक संरक्षण चळवळ बळकट करण्यासाठी आणि थेट विक्री क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय थेट विक्री संघ (आयडीएसए) आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi