नाशिक, पुणे, नागपूर येथे ‘इन्क्युबेशन पार्क’ व ‘फार्मा पार्क’ उभारणार
- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
नवी दिल्ली, दि. १२ : राज्यातील औषध संशोधन, उत्पादन व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी नाशिक, पुणे आणि नागपूर येथे ‘इन्क्युबेशन पार्क’ व ‘फार्मा पार्क’ उभारण्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पांना केंद्रीय मंत्री नड्डा यांनी प्राथमिक स्तरावर मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री झिरवाळ यांनी दिली.
No comments:
Post a Comment