मुंबई येथे आयोजित ‘एआय’ फॉर ॲग्री: शेतीचे भविष्य नव्याने घडविताना' या दोन दिवसीय परिषदेत “कृषीसाठी जनरेटिव्ह एआय: प्रथम टप्प्यातील बुद्धिमत्ता उलगडणे” या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चासत्रात एकस्टेप फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश बाबू, एआय या आशिया प्रादेशिक विभाग, जागतिक बैंकेचे संचालक महेश उत्तमचंदानी, आयआयटी मुंबईचे तंत्रज्ञान नवोपक्रम केंद्र, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी डॉ. प्रसाद रामनाथन यांनी सहभाग घेतला.
या सत्राचे समन्वय एकस्टेप फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश बाबू यांनी केले.जनरेटिव्ह ‘एआय’ मुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अचूक माहिती कशी पोहोचवता येईल, याचा आराखडा या सत्रात मांडण्यात आला.
No comments:
Post a Comment