मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यात पोलिसांची तत्परता
मुंबई, दि.06 : यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर 3 फेब्रुवारी रोजी सायं 5 वा. च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर प्रोपिलीन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीसांनी तत्परता दाखविली.
अपघातानंतर बोरघाट पोलीस केंद्र यांनी रायगड परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, खालापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक महसूल प्रशासन, महामार्ग पोलीस मुख्यालय व जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड येथील नियंत्रण कक्ष, अपघातग्रस्तांना मदत करणारी सामाजिक संस्था, मृत्यूंजय दूत पथक यांना अपघाताची माहिती दिली. टँकरमधील प्रोपिलीन गॅस हा अत्यंत ज्वलनशील असल्याने सायं 5.10 वाजता मुंबई बाजूकडे जाणरी वाहतूक अपघाताचे सुमारे 100 मिटर अलीकडे थांबविण्यात आली. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने क्रेनच्या सहाय्याने सिमेंट क्राँक्रीट दुभाजक बाजूला करून तेथून पुणे मार्गिकेवर वाहतूक वळविण्यात आली.
त्यानंतर सायं 6. 15 वाजेच्या सुमारास अपघाताजवळील वाहने काढल्यानंतर 44.100 किलोमीटर क्रमांकाच्या दुभाजक कटमधून पुण्याकडे जाणाऱ्या दोन व मुंबईकडे जाण्याकरीता एक मार्गिका सुरू केली. तसेच पी. ए यंत्रणेद्वारे थांबलेल्या वाहनचालकांना व नागरिकांना या घटनेबाबत माहिती देण्यात येत होती. जड वाहनांना एका मार्गिकेला थांबवून वाहतूक दुसऱ्या बाजुने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रसायन तज्ज्ञ धनंजय गिध यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. श्री. गिध रात्री 9.30 वाजता आल्यानंतर त्यांनी पाहणी करून याबाबतची माहिती अन्य रसायन तज्ज्ञांना दिली. टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याची माहिती रसायन तज्ज्ञ यांनी दिल्यांनतर खोपोली अग्नीशमक दल, परिसरातील सर्व एमआयडीसी अग्नीशमन दल यांना घटनास्थळी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या
No comments:
Post a Comment