श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक
समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती
हरिद्वार, दि.४ : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
उत्तराखंड – हरिद्वार येथील श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभात मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प.पू. जुनापीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी, राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेव गिरीजी, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल, स्वामी अखिलेश्वरानंदजी, स्वामी हरिचेतनानंदजी, स्वामी ललितानंद गिरीजी, महंत देवानंदसरस्वती, विनय रोहिला, प्रदीप बत्रा आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment