वैद्यकीय देयकांचा निपटारा आता होणार ' महाकर्मी ' पोर्टलद्वारे
मुंबई, दि.२४ : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल’ तसेच राज्यातील वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक सक्षम करणाऱ्या ‘वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम (व्हीएएमएस)’ या डिजिटल पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्य प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तसेच सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य सेवा उपसंचालक दुरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment