जपान, फिनलँड व चीनच्या वाणिज्यदूतांनी घेतली
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट
§ जपान राज्यस्तरावर सहकार्य वाढवणार
§ फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष मुंबई भेटीवर येणार
मुंबई, दि.२३ : जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी, फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत एरिक अफ् हॉलस्ट्रॉर्म व चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत कीन जी यांनी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
जपानच्या नव्या पंतप्रधान ताकाईची सनाए भारताशी घनिष्ठ संबंध ठेवण्याबाबत आग्रही असून उभय देश राज्यस्तरावर देखील सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी यांनी राज्यपालांना सांगितले. टोयोटा - किर्लोस्कर कंपनी छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प सुरु करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment