संवाद परिषदेत विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 'स्मार्ट ग्राहक, सक्षम बाजार': ग्राहकांना नेमके काय माहीत असायला हवे? यामध्ये मध्य मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा वंदना मिश्रा, ग्राहक वकील संघटनेचे अॅड. उदय वारुंजीकर तसेच संदीप वाही, उपाध्यक्ष, विक्री आणि प्रशिक्षण, इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. श्री. प्रांजल डॅनियल, मुख्य रणनीतीकार, यांनी मते मांडली. यामध्ये ग्राहकांनी थेट विक्री प्लॅटफॉर्मची निवड कशी करावी आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी'उद्योजकतेतून महिला सक्षमीकरण': महिला बचत गट आणि थेट विक्रेत्यांच्या यशोगाथा सादर करण्यात आल्या. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा (ज्ञानदा, कारंदवाडी (सांगली), जय महिला बचत गट, साक्री (धुळे) आणि इतरांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment