मागील सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षितपणे पार पडला. त्या साठी साधू- संत, महंत यांचे सहकार्य लाभले होते. यावेळेसही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कामे सुरू आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकार कुठलीही कसर ठेवणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कुंभमेळा मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्वाचा आहे. जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधांची भर पडणार आहे. कुंभमेळ्यामुळे विविध विकास कामे सुरू आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे.
No comments:
Post a Comment