Wednesday, 11 February 2026

राज्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या ११ पदांच्या निर्मितीस मान्यता

 राज्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या ११ पदांच्या निर्मितीस मान्यता

राज्यातील जिल्हा प्रशासनावर वाढत चाललेला प्रशासकीय ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना महसूलविषयक सेवा अधिक वेगाने व पारदर्शकपणे उपलब्ध व्हाव्यातया उद्देशाने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील ११ नवीन पदांच्या निर्मितीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यातील अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे सध्या तब्बल ३९ विषयांचे कामकाज आहे. यामध्ये शासकीय वसुलीगौणखनिज नियंत्रणनगरपरिषद व ग्रामीण भागातील जमिनीचे व्यवस्थापनजमाबंदी व जमीन सुधार विधिविधानांची अंमलबजावणीग्रामपंचायत व नोंदणी अधिनियमाशी संबंधित बाबीमहसूल अधिनियमांखालील अपीलेगावठाण विस्तारभूसंपादन प्रक्रियाबेघर व भूमिहीनांसाठी घरकुल योजनाप्रकल्पबाधित व पूरग्रस्तांचे पुनर्वसनजिल्हा परिषद व पंचायत समितीविषयक कामकाज अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi