Tuesday, 17 February 2026

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास

 त्यांचा शाश्वत विकास शक्य

-         विजया रहाटकर यांचा आशावाद

इंडिया ‘एआय’ इम्पॅक्ट समिटमध्ये   महिला समृध्दीचा निर्धार

 

नवी दिल्लीदि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षणप्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात ‘एआय’मुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी  या तंत्राच्या केवळ वापरकर्त्या’ म्हणून न राहता संशोधक आणि  निर्माते होऊन नव्या परिवर्तनाचे नेतृत्व करावे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला ‘एआय’ची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास होउ शकेल असा आशावाद राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi