लाखा बंजारा यांचे व्यापारातील स्थान
लखीशाह बंजारा हे केवळ धार्मिक सेवक नव्हते; ते त्या काळातील यशस्वी व्यापारी होते. दिल्लीसारख्या राजधानीत त्यांचे निवासस्थान आणि व्यापारी जाळे होते. तीन ते चार शतकांचा व्यापाराचा त्यांचा अनेक पिढयांचा अनुभव होता. आपल्या मेहनतीने, प्रामाणिकपणाने आणि व्यापार पूरक साहित्य - सुविधांनी त्यांनी गौरवशाली परंपरा निर्माण केली होती. स्वतःचा एक समुदाय,व्यापाराचा वकूब,शब्दाला जपण्याची स्थिरता,धर्माचा स्वाभिमान,व्यवहारातील पारदर्शिता, वक्तशीरपणा,आणि लढाऊ वृत्तीमुळे आदर युक्त दहशत या समाजाची तत्कालीन व्यवस्थेत होती. त्यामुळेच गुरुजींच्या पार्थिवाला सुरक्षितपणे हलवणे त्यांना शक्य झाले.
No comments:
Post a Comment