ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान
यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ वितरणास सुरुवात
-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, दि. 12: ग्रंथालय संचालनालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खरेदी करण्यात आलेल्या सन 2023 मधील ग्रंथांचे वितरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
उच्च् व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधीच्या “ग्रंथभेट” योजनेंतर्गत 2024-25 या वर्षासाठी राज्य ग्रंथालय नियोजन समितीने मंजूर केलेल्या कृती आराखड्यानुसार 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांमधून निवड प्रक्रिया पार पडली आहे. राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीमार्फत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील निवडक ग्रंथांची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे येथे करण्यात आली असून या ग्रंथांचे वितरण सुरू झाले आहे.
No comments:
Post a Comment