सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 4 February 2026
विकसित भारताच्या मार्गाला गती देणारा आणि भारताला सक्षम व आत्मनिर्भर
विकसित भारताच्या मार्गाला गती देणारा आणि भारताला सक्षम व आत्मनिर्भर बनवणारा हा अर्थसंकल्प - कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
मुंबई, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारत संकल्पनेला चालना देणारा असून देशाच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा आहे, अशी प्रतिक्रिया कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.
लोककल्याण कार्यालय, कांदिवली पश्चिम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प उत्पादन व गुंतवणूक वाढीस पोषक असून भारताला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करीत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्ग आणि उद्योजक या सर्व घटकांच्या उन्नतीचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. सबका साथ, सबका विकास या तत्त्वावर आधारित आर्थिक विकास, क्षमतावृद्धी आणि सर्वसमावेशक संसाधनवाटपावर विशेष भर देण्यात आला आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो, बंदरे, ऊर्जा, गृहनिर्माण आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यांसारख्या पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे भातखळकर म्हणाले.
बायोफार्मा क्षेत्रासाठी १०,००० कोटी रुपये, सेमीकंडक्टरसाठी ४०,००० कोटी रुपये, सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर, राष्ट्रीय जलमार्ग आणि एमएसएमईसाठी स्वावलंबी भारत निधी यामुळे आत्मनिर्भर भारताचा मार्ग अधिक मजबूत होईल, असा विश्वास कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला.
भारताला अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

No comments:
Post a Comment