Tuesday, 24 February 2026

ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे 20 मार्चला भूमिपूजन

 ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे 20 मार्चला भूमिपूजन

-         सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबईदि. 23 : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च 2026 रोजी शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असूनयाच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 55 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असूनवर्धापन दिन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याचक निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.

 

ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस रोजगार हमी योजनाफलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावलेविभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनिल वारेसहसचिव सोमनाथ बागुलसहाय्यक आयुक्त सुनिल जाधवनगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकरतहसीलदार महेश शितोळे यांच्यासह संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi