Sunday, 15 February 2026

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या “राष्ट्रीय गोपाल रत्न – 2025” पुरस्कार घोषणा

 केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय गोपाल रत्न – 2025 पुरस्कार घोषणा करण्यात आली असून राज्यातील दोन पशुपालकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रगतीशील पशुपालक श्रीमती श्रद्धा ढवण यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते श्रीमती ढवण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लाल कंधारी व देवणी गट पशु पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 * उदगीर प्रकल्प:  उदगीरचे दूध भुकटी केंद्र 100 कोटी खर्चून पुन्हा सुरू करणार.

 * नैसर्गिक शेती: रासायनिक खतांमुळे बिघडलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गोमूत्र व शेणापासून तयार होणाऱ्या 'जीवामृता'ला प्रोत्साहन.

 *आरोग्य सेवा: राज्यातील 2841 पशु दवाखान्यांचे आधुनिकीकरण आणि फिरत्या पशु ॲम्ब्युलन्स सेवेचे जाळे.

 *विकास दर: पशुसंवर्धन क्षेत्राचा विकास दर सध्याच्या 4-8% वरून 25% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

*राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 366 प्रकल्पांना मंजुरी.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi