Monday, 5 January 2026

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना ‘SHEBOX पोर्टल’वर नोंदणी करण्याचे आवाहन wcdmumupnagar@gmail.com

 कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना

‘SHEBOX पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ५: महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने शीबॉक्स (SHEBOX) पोर्टल तयार केले असूनसर्व आस्थापनांनी या पोर्टलवर आपले कार्यालय नोंदवणे अनिवार्य आहे. मुंबई उपनगरातील सर्व आस्थापनांनी तात्काळ या पोर्टलवर नोंदणी करून अंतर्गत समितीची तसेच कार्यालयाची अद्ययावत माहिती सादर करावीअसे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (मुंबई उपनगर) एस. टी. कुऱ्हाडे यांनी केले आहे.

 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणप्रतिबंधमनाई व निवारण अधिनियम 2013 नुसार10 किंवा त्याहून अधिक अधिकारी-कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांना अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे.  या अधिनियमाच्या कलम 19 अन्वये कार्यालय प्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. जर कोणत्याही कार्यालयाने ही समिती स्थापन केली नसल्यास किंवा अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यासकलम 26 नुसार रु. 50,000/- पर्यंत दंडाची तरतूद आहे.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीमुंबई उपनगर प्रशासकीय इमारतपहिला मजलादुसरा टप्पाआर.सी. मार्गचेंबूरमुंबई-७१ दूरध्वनी : ०२२-२५२३२३०८

E-mail : wcdmumupnagar@gmail.com यावर संपर्क करावाअसेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi