Saturday, 10 January 2026

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची प्रभावी अंमलबजावणी करा

 भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शिर्डी कृती आराखड्याची

प्रभावी अंमलबजावणी करा

-मुख्य सचिव राजेश अग्रवाल

 

सिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठकीत आराखड्याचे सादरीकरण

 

शिर्डीदि. १६ : नाशिक येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयार केलेला शिर्डी कृती आराखडा’ सर्वसमावेशक आहे. भाविकांची सुरक्षाआरोग्य व वाहतूक नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देऊन या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावीअसे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज येथे दिले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे आयोजित बैठकीत मुख्य सचिव श्री. अग्रवाल बोलत होते. या बैठकीला नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामजिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाश्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारीपोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेअपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi