Sunday, 25 January 2026

आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा

 आरोग्य सेवेत एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि.16 :- राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षमवेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावाअसे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीत समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले कीआधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेलउपचार अधिक अचूक व वेळेत मिळतील आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचवता येतील. आजच्या डिजिटल युगात आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि एआय आधारित उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi