Saturday, 17 January 2026

अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत वाहनधारकांना मोठा दिलासा

 अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत

वाहनधारकांना मोठा दिलासा

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच ईलेक्ट्रीकल मोटार कारबसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ई- व्हेईकल्स धारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापराकरिता पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांकरिता एकेरी प्रवासाचा पथकर दर ही निश्चित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे आहेत.


 

अ क्र

वाहनांचा प्रकार

शिवडी ते गव्हाण   

शिवडी ते शिवाजीनगर

शिवाजी नगर ते गव्हाण

मोटरजीपव्हँनहलके मोटार वाहन

२५० रु.

२०० रु.

५० रु.

हलके व्यावसायिक वाहनहलके मालवाहू वाहनमिनी बस

४०० रु.                       

३२० रु.

८० रु.

ट्रक अथवा बस ( दोन आसांचे)

८३० रु.

६५५ रु.

१७० रु.

तीन आसांचे व्यावसायिक वाहन

९०५ रु.

७१५ रु.

१८५ रु.

अवजड बांधकाम यंत्रसामग्रीजमीन खोदाई यंत्रसामग्रीअधिक आसांचे वाहन

१३०० रु.

१०३० रु.

२७० रु.

अति अवजड वाहनसात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन

१५०० रु.

१२५५ रु.

३२५ रु.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi