Tuesday, 23 December 2025

रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत विशेष घट

 दरम्यानमुंबईपुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यूंमध्ये मोठी घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत या मार्गावर ८२ अपघाती मृत्यू झाले होतेतर २०२५ मध्ये ही संख्या ६१ वर आली आहे. म्हणजेच २१ मृत्यूंनी (२६ टक्के) घट झाली आहे. तसेच अपघातांची संख्या ६६ वरून ५४ इतकी कमी झाली असूनत्यामध्ये १८ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

 

रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत विशेष घट दिसून आली आहे. नागपूर शहरात २१ टक्केपालघरमध्ये २० टक्केअमरावतीत १७ टक्केपुण्यात १५ टक्केधुळ्यात १४ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२ टक्क्यांनी अपघाती मृत्यू कमी झाले आहेत, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi