Saturday, 13 December 2025

मालवणी परिसराच्या पुनर्विकासासाठी 'क्लस्टर मॉडेल' विकसित करा

 मालवणी परिसराच्या पुनर्विकासासाठी 'क्लस्टर मॉडेलविकसित करा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मालवणी परिसर पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक

 

नागपूरदि. 13 : मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना क्लस्टर मॉडेल विकसित करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत या परिसरातील अंबुजवाडीदादासाहेब गायकवाड नगर व राजीव गांधी नगर येथील झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीस गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरआमदार असलम शेख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमालवणी परिसरातील झोपड्यांचे राहिलेले सर्वेक्षण पूर्ण करावे. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्याकडे असलेल्या क्षेत्रानुसार त्यांनी सर्वे करावा. मालवणी परिसरातील संपूर्ण झोपड्यांचा सर्वे झाल्यानंतर यंत्रणांनी एकत्रितरित्या अहवाल द्यावा. कायदेशीर अडचणी असलेल्या क्षेत्राविषयी स्वतंत्रपणे कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी विकासाची कामे असतीलती क्षेत्रे पुनर्विकासासाठी प्राधान्याने घ्यावीत.

'क्लस्टर मॉडेलने विकास केल्यास संपूर्ण मालवणी परिसराचा कमी कालावधीत पुनर्विकास होईल. ही झोपडपट्टी पुनर्विकासाचा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पास गतीने पूर्णत्वास न्यावेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi