Saturday, 13 December 2025

साडेसतरानळी येथील अॅमनोरा मॉल ते पाईपलाईन या १८ मीटर आर.पी. रस्त्यात अडथळा निर्माण करणारी झाडे छाटणे

 साडेसतरानळी येथील अॅमनोरा मॉल ते पाईपलाईन या १८ मीटर आर.पी. रस्त्यात अडथळा निर्माण करणारी झाडे छाटणे किंवा स्थलांतरित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली असूनपरवानगी मिळाल्यानंतर झाडे छाटणेपुनर्रोपण व वृक्षारोपणाची कार्यवाही पथ विभागामार्फत करण्यात येणार आहे.

साडेसतरानळी गावाजवळील यश हॉस्पिटल परिसरात पावसाचे पाणी साचणे व रस्ता खराब होण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच लेबरशेड मजूरवस्तीची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने संबंधित मालकाशी ती ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू असूनजागा ताब्यात आल्यावर रस्ता विकासाची प्रक्रिया गतीमान केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi