आयआयटी-जेईई प्रशिक्षण संदर्भात मंत्री सावे म्हणाले, कोटा येथील नामांकित संस्थेचे प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे आहे. या उपक्रमासाठी २० कोटी रुपये खर्च असून ३,५०० विद्यार्थी सहभागी आहेत. ऑफलाईन-ऑनलाईन दोन्ही पद्धतींमध्ये खर्च समान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाज्योतीमार्फत यूपीएससी प्रशिक्षणासाठी १०० आणि एमपीएससीसाठी ४०० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कोटा निश्चित करण्यात आला आहे. या योजनेसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. निधीतील तूट भरून काढण्यासाठी वित्त विभागाकडे मागणी करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक तरतुदीचे आश्वासन दिल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.
पीएचडी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित स्टायपेंडसाठी, ३० जून २०२५ पर्यंत सुमारे ३१.९१ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. प्रलंबित राहिलेला स्टायपेंड टप्प्याटप्प्याने दिला जात असून नियमित स्टायपेंड मात्र वेळेवर दिला जात असल्याचेही मंत्री सावे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment